Next

वर्धापन दिन सोहळा शिवसेनेचा; मार्गदर्शन केले मुख्यमंत्र्यांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 01:43 PM2019-06-20T13:43:31+5:302019-06-20T13:43:58+5:30

मुंबई - शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री  म्हणाले ...

मुंबई - शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री  म्हणाले की, आमचे एकत्र येणे हे निवडणुकीसाठी नाही, तर लोकशाहीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी ! इतिहासात डोकावून पाहिले तर, एक राजा ताजमहाल बांधत होता, तर एक राजे दुष्काळ पीडित जनतेला मदत करीत होते. आपली परंपरा ही अशी सेवेची आहे. एक नवीन परंपरा आज सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला दिले, यासाठी मी उद्धव ठाकरे आणि तमाम शिवसैनिकांचा आभारी आहे.