Next

मी AK 47 तर राहुल गांधी तोफ, नवज्योत सिंग सिद्धूंचे मोदींना खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:37 PM2019-05-16T13:37:19+5:302019-05-16T13:37:57+5:30

बिलासपूर - काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलंं आव्हान दिलं आहे. कोणत्याही ...

बिलासपूर - काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलंं आव्हान दिलं आहे. कोणत्याही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी माझ्यासमोर या, तुमच्या प्रत्येक मुद्द्याला आव्हान देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी एके 47 आहे तर राहुल गांधी तोफ आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी राफेलचे दलाल म्हणून जातील असा टोला त्यांनी मोदींना लगावला.