Next

जगातील सर्वात उंच पुतळ्याला बसला पावसाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 02:37 PM2019-06-29T14:37:13+5:302019-06-29T14:37:46+5:30

गुजरातमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जगातील सर्वात उंच असलेल्या  स्टॅच्यू ऑफ युनिटीला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुतळ्याच्या 150 मीटर उंचीवर ...

गुजरातमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जगातील सर्वात उंच असलेल्या  स्टॅच्यू ऑफ युनिटीला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुतळ्याच्या 150 मीटर उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत पावसाचं पाणी साचल्याची माहिती आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच हा पुतळा आहे. प्रेक्षकांना उंचावरुन नर्मदा नदीवरील धरण पाहता यावं यासाठी ही गॅलरी बनविण्यात आली होती. मात्र पहिल्या पावसात असा फटका बसल्याने पुतळ्याच्या नियोजनाचा अभाव असल्याचं चित्र दिसून येत आहे.