Next

कॅमेरामन बेशुद्ध झाला...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेचच भाषण थांबवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 08:13 PM2019-01-30T20:13:48+5:302019-01-30T20:14:41+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष  राहुल गांधी  यांनी फोटोग्राफर पडल्यानंतर विचारपूस केल्याच्या व्हिडिओनंतर काही वर्षांपूर्वी एका सभेदरम्यान पोलीस चक्कर येऊन पडला तरीही मोदींनी ...

काँग्रेसचे अध्यक्ष  राहुल गांधी  यांनी फोटोग्राफर पडल्यानंतर विचारपूस केल्याच्या व्हिडिओनंतर काही वर्षांपूर्वी एका सभेदरम्यान पोलीस चक्कर येऊन पडला तरीही मोदींनी भाषण सुरुच ठेवल्याच्या व्हिडिओवरून मोदी ट्रोल झाले होते. मात्र, आज सुरत मधील एका सभेवेळी कॅमेरामन चक्कर येऊन बेशुद्ध झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लागलीच भाषण थांबविले आणि अधिकाऱ्यांना तातडीने अ‍ॅम्बुलन्स आणण्यास सांगितले.