Next

राजस्थानचे विद्यार्थी गिरवणार अभिनंदनचा 'धडा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 09:55 AM2019-03-07T09:55:02+5:302019-03-07T09:55:35+5:30

भारतीय हवाईदलाचे धाडसी पायलट अभिनंदन यांची शौर्यगाथा आता शाळेतील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शालेय ...

भारतीय हवाईदलाचे धाडसी पायलट अभिनंदन यांची शौर्यगाथा आता शाळेतील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना लवकरच शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. राजस्थान सरकारने अभिनंदन यांचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं  राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी अभिनंदनदिवस असा हॅशटॅगही वापरला आहे.