Next

बालंबाल बचावले; एअर इंडियाच्या विमानाला दुरुस्तीवेळी आग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 11:39 AM2019-04-25T11:39:41+5:302019-04-25T11:40:00+5:30

दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे. एअर इंडियाचं बोइंग 777 विमानाला अचानक ...

दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे. एअर इंडियाचं बोइंग 777 विमानाला अचानक आग लागली. विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच अॅक्जिलियरी पॉवर युनिटमध्ये आग लागली. विमानाला आग लागली त्यावेळी विमानात कोणताही प्रवासी नव्हता. ही दुर्घटना एअर इंडियाच्या विमान क्रमांक बी777-200एलआरमध्ये झाली आहे.