Next

सेल्फीचा हा नाद जीवघेणा ठरला असता तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:37 PM2018-11-27T12:37:30+5:302018-11-27T12:42:23+5:30

अझहर शेख नाशिक : सध्याच्या तरुणाईला सेल्फीचा खूपच मोह आहे. या सेल्फीच्या मोहापायी अनेक अपघात झाल्याच्या घटना सातत्याने समोर ...

अझहर शेखनाशिक : सध्याच्या तरुणाईला सेल्फीचा खूपच मोह आहे. या सेल्फीच्या मोहापायी अनेक अपघात झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. नाशिकमध्ये एक द्राक्षाच्या बागेत तारेत अडकलेल्या बिबट्या सोबत एक तरुण सेल्फी घेण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहे. बिबट्याचा केवळ एक पाय तारेत अडकलेला होता, दुर्दैवाने तो निसटला असता तर अवघ्या काही फुटावर असलेल्या तरुणावर त्याची झडप पडली असती, पुढे काय झाले असते त्याची कल्पना न केलेली बरी. सुदैवाने तसे काही घडले नाही अन अनर्थ टळला असेच म्हणावे लागेल.