Next

वृक्षसंपदा होतेय खाक अन् प्रशासनाचे डोळ्यांवर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 09:27 PM2018-04-30T21:27:13+5:302018-04-30T21:28:20+5:30

- अझहर शेख   नाशिक -  खळाळणारी गोदामाई...काठावर बहरलेली वृक्षराजी... पक्ष्यांच्या स्वरांनी दुमदुमलेला गोदापार्कचा परिसर...आल्हाददायक वातावरणाची अनुभूती...वृक्षराजीच्या हिरवाईचा लाभलेला ...

- अझहर शेख  नाशिक -  खळाळणारी गोदामाई...काठावर बहरलेली वृक्षराजी... पक्ष्यांच्या स्वरांनी दुमदुमलेला गोदापार्कचा परिसर...आल्हाददायक वातावरणाची अनुभूती...वृक्षराजीच्या हिरवाईचा लाभलेला साज... अशा या निसर्गरम्य परिसरात मागील काही दिवसांपासून अज्ञात पर्यावरणाच्या शत्रूंकडून वृक्षांना आग लावण्याचा प्रताप केला जात आहे. त्यामुळे झाडांच्या जळीतकांडाने महापालिकेच्या हद्दीमधील नाशिकचा गोदापार्क चर्चेत आला आहे. अज्ञात लोकांनी येथील वृक्षांचे बुंधे पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे; मात्र याबाबत महापालिका व पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन आहे...त्याचाच हा वृत्तांत..