Next

नाशिकमधील गिरणारेत बिबट्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:08 PM2019-03-11T15:08:22+5:302019-03-11T15:11:29+5:30

मागील चार दिवसांपासून गिरणारे, गंगाम्हाळुंगी शिवारात बिबट्याने नागरी वस्तीकडे मोर्चा वळवत दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.

नाशिक : मागील चार दिवसांपासून गिरणारे, गंगाम्हाळुंगी शिवारात बिबट्याने नागरी वस्तीकडे मोर्चा वळवत दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. या बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कौशल्याचा वापर करत योग्य पध्दतीने पिंजरा लावला. सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि गिरणाऱ्याच्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.