Next

मराठा क्रांती मोर्चा २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर धडकणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 03:29 PM2018-11-10T15:29:55+5:302018-11-10T15:32:32+5:30

मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी वरदलक्ष्मी लॉन्स येथे विभागस्तरीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी वरदलक्ष्मी लॉन्स येथे विभागस्तरीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरक्षण मिळविण्यासाठी येत्या 26 तारखेला विधान भवन येथे काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चा बाबत नियोजन करण्यात आले. धडक मोर्चाच्या जनजागृती साठी 14 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उत्तर महाराष्ट्रात विभागस्तरीय संवाद यात्रा काढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.