ती 'चांदनी' बनून आली, चमकली अन् 'सदमा' देत रडवून गेली!... श्रीदेवींना भावपूर्ण श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 01, 2018 9:53pm

मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेल्या अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाल्या. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. त्यानंतर 1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.

मुंबई कडून आणखी

सिद्धिविनायक मंदिरात फळांची आरास...
अहो ऐकलंत का? मानसी नाईकचं यंदा कर्तव्य आहे!!!
पाहा अशोक मामांचा 'हा' लव्हगुरु अंदाज,अन अनिकेतने केले गायनात पदार्पण
Bharat Bandh: मनसैनिकांनी दिंडोशीतील भाजपा नगरसेवकाचे कार्यालय फोडले
Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको

आणखी वाचा