Next

लोकल पकडण्याची घाई युवा अभिनेता प्रफुल्ल भालेरावच्या जीवावर बेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 07:06 PM2018-01-22T19:06:21+5:302018-01-22T19:06:47+5:30

मुंबई  - झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. ...

मुंबई  - झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. पहाटेच्यावेळी लोकल पकडण्याची घाई प्रफुल्लच्या जीवावर बेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.