मुंबईत मेट्रोच्या ‘कृष्णा वन आणि टू’ चे काम जोरात

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 7:48pm

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग ३ प्रकल्पाच्या भुयारी कामाला माहिम येथील नयानगरमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. माहिम येथून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा भुयारी मार्ग खोदण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा असून, मेट्रोच्या संपूर्ण भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. मेट्रो-३ प्रकल्पाचे खोदकाम टनेल बोअरिंग मशिनच्या मदतीने केले जात आहे. ‘कृष्णा वन’ या मशिनद्वारे आतापर्यंत १२० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून,  ‘कृष्णा टू’ या मशिनद्वारे आतापर्यंत ७० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. (व्हिडिओ - दत्ता खेडेकर)

संबंधित

Dahi Handi 2018 : मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार
#Mumbai: शिट्टी वाजली, मोनो पुन्हा सुटली...
लोकलच्या डब्यांना निसर्गचित्रांचा साज, लवकरच होणार सुखकर प्रवास
Mumbai Monorail : वडाळा-चेंबूर प्रवास होणार सोपा
मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

मुंबई कडून आणखी

सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या चरणी
पाहा लालबागच्या राजाची संपुर्ण आरती Live
भिडेंने स्वत:च्या घरी साकारला गोकुलधामचा देखावा
बाप्पा आले की सागर कारंडेला करावे लागते 'हे' काम
गायिका नेहा राजपाल कडून बाप्पाला 'मानवंदना'

आणखी वाचा