Next

... तर 21 तारखेपासून राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला 'इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:17 PM2018-10-27T16:17:10+5:302018-10-27T16:21:27+5:30

मुंबई - मराठा क्रांती ठोक मोर्चाने शनिवारी दुपारी यशवंतराव चव्हाण केंद्र याठिकाणी घेतलेल्या राज्यव्यापी बैठकीत 20 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत ...

मुंबई - मराठा क्रांती ठोक मोर्चाने शनिवारी दुपारी यशवंतराव चव्हाण केंद्र याठिकाणी घेतलेल्या राज्यव्यापी बैठकीत 20 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजासाठी आरक्षणाची घोषणा केली नाही, तर 21 तारखेपासून राज्यभर तीव्र आंदोलनाला सुरुवात होईल, अशी माहिती मोर्चाचे समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी दिली.