Next

Lok Sabha Election 2019 : मुंबईसह महाराष्ट्रात मतदारांचा मतदानासाठी उत्साह, अनेक ठिकाणी रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:30 PM2019-04-29T12:30:56+5:302019-04-29T12:33:48+5:30

लोकसभा निवडणुकीच्या  चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे.  मुंबईसह महाराष्ट्रात मतदारांचा मतदानासाठी उत्साह पाहायला मिळत ...

लोकसभा निवडणुकीच्या  चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे.  मुंबईसह महाराष्ट्रात मतदारांचा मतदानासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईतल्या  ईशान्य मतदारसंघासह  सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.