Next

एका व्हीलचेअरवरच्या लग्नाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 08:08 PM2019-05-13T20:08:34+5:302019-05-13T20:09:41+5:30

सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी ...

सनईचे सूर निनादत असतानाच, करवल्यांची मंडपात एकच घाई झाली होती. एवढ्यात मुहूर्ताची वेळ झाल्यावर मंगलाष्टका सुरू केल्या. अक्षता टाकण्यासाठी नवेट गावातील सहदेव एरीम यांच्या मंडपात सर्व धर्मियातील बंधू-भगिनींची गर्दी केली होती. हा विवाह विशेष होता. कारण दोन दिव्यांगांची मने जुळून आली होती अन् मैत्रीचं रुपांतर  लग्नबंधनात  झाले होते. या आनंद सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुवर्णा व योगेश या दोन दिव्यांग उभयतांचं हे  लग्न  पाहण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी गर्दी केली होती.