Next

जळगावात भुलाबाई महोत्सवातून दिला सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 07:15 PM2017-09-17T19:15:36+5:302017-09-17T19:17:11+5:30

जळगाव- केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमीतर्फे आयोजित भुलाबाई महोत्सवात चिमुकल्या मुलींसह तरुणी, महिलांनी सादर केलेल्या भुलाबाईच्या पारंपरिक गीतांनी ...

जळगाव- केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमीतर्फे आयोजित भुलाबाई महोत्सवात चिमुकल्या मुलींसह तरुणी, महिलांनी सादर केलेल्या भुलाबाईच्या पारंपरिक गीतांनी उपस्थित महिलांच्या आठवणींना उजाळा दिला. आकर्षक, रंगबिरंगी वेशभूषा, तालबद्ध टिप:यांचा नाद अशा बहारदार वातावरणात सादर विविध गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यंदा या महोत्सवाचे 16 वे वर्ष होते.  तीन गटात झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत  34 संघांनी सहभाग नोंदविला.