Next

सातव्या माळेला अंबाबाईची भुवनेश्वरी रूपात महापूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 06:09 PM2017-09-27T18:09:02+5:302017-09-27T18:09:35+5:30

कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (बुधवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची भुवनेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.  देवीच्या दशमहाविद्यांमधील ही ...

कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (बुधवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची भुवनेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.  देवीच्या दशमहाविद्यांमधील ही चौथ्या क्रमांकाची देवता असून ती श्रीकुलामधील एक प्रधान देवी आहे. त्रिपुरसुंदरीचे स्वरुपासारखेच या देवीचे रुप असून फक्त हातात पुष्पबाण व ईक्षुदंड नाही. भुवनेशी ही पाशांकुशवरदाभयहस्तका म्हणजेच तिच्या हातांमध्ये पाश, अंकुश आहे तसेच तिने वरद आणि अभयमुद्रा धारण केल्या आहेत. मंत्रावरुन या देवीला एकाक्षरी विद्या असेही म्हटले जाते. देवीचा वर्ण उगवत्या सुर्याप्रमाणे तांबडा असून त्रिपूरसुंदरीने निर्माण केलेल्या विश्वाचे ती संचलन करते. या देवतेच्या नावे भुवनेश्वरी संहिता नावाचा ग्रंथ असून त्यात दुर्गासप्तशतीची महती सांगितली आहे. ही पूजा श्रीपुजक माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.