Next

‘स्वयम’मध्ये दिव्यांग मुले साकारतायत ‘ट्री गणेशा...’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 01:00 PM2017-08-04T13:00:08+5:302017-08-04T13:02:03+5:30

दिव्यांग मुलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वयम् उद्योग केंद्रात यंदा इको-फ्रेंडली गणेशमूर्तीतून ‘ट्री गणेशा’ साकारला जात आहे. संस्थेतर्फे प्रत्येक भक्ताला गणेशमूर्तीसोबत एका कुंडीत फळझाडांचे बी घालून देण्यात येणार आहे. विसर्जनानंतर गणेशमूर्तीची माती या कुंडीत घातल्यानंतर त्यातून रोप उगवेल, अशी या ‘ट्री गणेशा’मागील संकल्पना आहे.