ॲसिडच्या टँकरमधून वायूगळती; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत on Sun, December 24, 2017 2:23pm
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात दाभिळ येथे ॲसिडचा टँकर उलटून वायूगळती झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तीन तासांनी वायूगळती थांबवून रस्ता धुतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सुट्ट्यांमुळे महामार्गावरील वाहतूक वाढलेली असताना हा अपघात झाल्याने अनेक वाहने रखडली.