Next

माझ्या मुलाएवढा मोठ्ठा हो, राजू शेट्टींच्या आईने दिले धैर्यशील माने यांना आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:39 AM2019-05-29T11:39:26+5:302019-05-29T11:46:01+5:30

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने ...

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभव करणारे शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी थेट राजू शेट्टींच्याच घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. माझा मुलगा जसा मोठा झाला, तसा हो, माझा आशिर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहील, असा आशीर्वादही राजू शेट्टी यांच्या आईने धैर्यशील माने यांना दिला आहे.