Next

कोल्हापुरात शालिनी सिनेटोनसाठी ‘चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन’ हा ‘काळा दिन’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 01:19 PM2018-12-01T13:19:15+5:302018-12-01T13:19:50+5:30

कोल्हापूर : चित्रपटसृष्टीचीच नव्हे तर कोल्हापूरकरांची अस्मिता असलेल्या शालिनी सिनेटोनची आरक्षित जागा शासनातील कारभारी मंत्री व महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ...

कोल्हापूर : चित्रपटसृष्टीचीच नव्हे तर कोल्हापूरकरांची अस्मिता असलेल्या शालिनी सिनेटोनची आरक्षित जागा शासनातील कारभारी मंत्री व महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या घशात घालून आमची घोर फसवणूक केली आहे. याविरोधात शनिवारी साजरा होणारा ‘चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन’ हा ‘काळा दिन’ म्हणून पाळण्यात आला.  यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, सतीश बिडकर, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.