Next

दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहातील कैद्यांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 03:27 PM2018-11-03T15:27:35+5:302018-11-03T15:29:26+5:30

कोल्हापूर - दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. बाजारातील किमतीपेक्षा 10 ते 15 ...

कोल्हापूर - दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. बाजारातील किमतीपेक्षा 10 ते 15 टक्क्यांनी कमी दरांत या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन दिवस सुरू राहणारे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. खुर्च्‍या, स्टूल, देवघर, चौरंग, टेबल, पिशव्या, झाडू, खराटे, बेडशीट, हातरुमाल, चादर, लोड, कँडल स्टँड, अगरबत्ती स्टँड, फ्लॉवर पॉट, लूम कॉटन चेअरमेट, नॅपकिन, पायपुसणी,शर्ट-पँट, लोखंडी वस्तू आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.