Next

VIRAL : Bungy Jumping करताना इन्स्ट्रक्टर दोरी लावायला विसरला; तरूणी कोसळली दरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 12:56 PM2018-06-06T12:56:20+5:302018-06-06T12:57:05+5:30

सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे कोणतीही घटना व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. मग तो एखादा अपघात असो किंवा मजेशीर ...

सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे कोणतीही घटना व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. मग तो एखादा अपघात असो किंवा मजेशीर प्रसंग अथवा व्हीडिओ असो, अवघ्या काही क्षणांमध्ये त्याची क्लीप लोकांपर्यंत पोहोचलेली असते.सध्या इंटरनेटवर एका अपघाताची क्लीप अशीच व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये एक तरुणी बंजी जम्पिंग करताना दिसत आहे. एका दरीच्या टोकावरून ही तरूणी बंजी जम्प करायच्या तयारीत दिसते. तिच्या पाठीमागे एक इन्स्ट्रक्टरही उभा असलेला दिसत आहे. हा इन्स्ट्रक्टर या तरूणीला दरीत ढकलून देतो. मात्र, पुढच्याच क्षणाला त्याला आपली चूक लक्षात येते