Next

जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 04:19 PM2017-10-11T16:19:56+5:302017-10-11T16:37:17+5:30

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच सभेचे चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या ...

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच सभेचे चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या सोबतच मागील सभेचे प्रोसेडिंगचे वाचन व माईक सिस्टीम बंदच्या मुद्यावरूनदेखील गोंधळ वाढला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले होते. सदस्यांनी चित्रीकरणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. गोंधळ वाढू लागल्याने जि.प.मध्ये पोलिसांना बोलवावे लागले.