लाइव न्यूज़
 • 11:14 AM

  यवतमाळ: मातोश्री विणादेवी जवाहरलाल दर्डा यांच्या सहाव्या पुण्य स्मरणानिमित्त प्रेरणास्थळी आदरांजली वाहण्यात आली, यावेळी लोकमत एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमत एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, लोकमत कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी उपस्थित होते

 • 11:09 AM

  सोलापूर : रिधोरे येथे दूध दरवाढीसाठी शेतकरी जनावरसह रस्त्यावर, रास्ता रोको आंदोलन सुरू

 • 11:07 AM

  हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन.

 • 10:59 AM

  सांगली : आरवडे येथे दूध उत्पादकांनी दूध वाहतूक करणारी गाडी अडवून 1500 लिटर दूध ओतले

 • 10:58 AM

  शनी शिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या ताब्यात, राज्य सरकारकडून विधेयकाला विधानसभेत मंजुरी. शनैश्चर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018ला मंजुरी.

 • 10:45 AM

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद, राज ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर.

 • 10:31 AM

  मुंबई : ठोस आश्वासन मिळेपर्यंत दूध दरवाढीसाठीचे आंदोलन सुरूच राहणार - राजू शेट्टी

 • 10:26 AM

  नागपूर : खसाळा येथे प्लास्टिकच्या फॅक्टरीत आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.

 • 10:15 AM

  सोलापूर : उजनी धरण 13 टक्के भरले, धरणातून 24 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

 • 10:12 AM

  पंढरपूर - विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, व्हीआयपी दर्शनावरून मंदिरात गोंधळ, शिवीगाळ, मारहाण झाल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप

 • 10:02 AM

  उत्तराखंड - उत्तराखंड परिवहनची बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

 • 09:45 AM

  सांगली : पोलीस शिपाई समाधान मानटे खुनप्रकरणी मुख्य संशयित झाकीर जमादारला कोल्हापुरात अटक

 • 09:26 AM

  केरळ - एर्नाकुलम येथे कारचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू 2 जखमी

 • 08:47 AM

  बीड : परळी येथे मराठा आरक्षण प्रश्नी तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच.

 • 08:44 AM

  सोलापूर : वारीमध्ये सलुन व्यवसाय करणाऱ्या देविदास भगवान डुबाळे (वय ७५) या वारकऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

All post in लाइव न्यूज़

हेल्थ अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या