Next

पोस्टाच्या संपाने बेरोजगारांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:29 AM2019-01-09T01:29:17+5:302019-01-09T01:29:46+5:30

डाक सेवेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नॅशनल फेडरेशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ पोस्टल आॅर्गनायझेशनच्या वतीने ८ व ९ जानेवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

ठळक मुद्देदुपारनंतर अनेक जण परतले : पदभरतीचे अर्ज भरण्यासाठी शेकडो उमेदवारांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डाक सेवेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नॅशनल फेडरेशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ पोस्टल आॅर्गनायझेशनच्या वतीने ८ व ९ जानेवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. याच दरम्यान रोजगार निर्मिती उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत शिपाई व इतर पदांसाठी जाहीरात निघाली. त्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत १० जानेवारीपर्यंत आहे. परंतू डाक कर्मचाºयांच्या संपामुळे त्यांचे अर्ज वेळेत पोहोचण्याची शक्यता नसल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो बेरोजगारांची जीव टांगणीला लागला आहे.जिल्हाभरातील अनेक बेरोजगारांनी पोस्टाच्या कार्यालयात दस्तावेज व अर्जाचे स्पीडपोस्ट करण्यासाठी मंगळवारी सकाळी गर्दी केली. परंतू संपामुळे पोस्टाच्या कार्यालयात त्यांचे अर्ज घेण्यास नकार देण्यात आला. अर्ज घेण्याची विनवणी करीत हे बेरोजगार दीड ते दोन तास ताटकळत होते. मात्र काही लोकांच्या मध्यस्थीनंतर काही वेळेसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. पण त्यानंतर पोस्टाच्या वतीने अर्ज स्वीकारण्यात आले नाही. परिणामी अनेक बेरोजगार युवकांना निराश होऊन परतावे लागले.रोजगार निर्मिती उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत एचपी मॅन पॉवर कार्पोरेशन प्रादेशिक कार्यालय मुंबई यांचेमार्फत येथे विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी आॅफलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जानेवारी २०१९ आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बेरोजगार युवक या भरती प्रक्रियेसाठी पोस्टाच्या मार्फत अर्ज दाखल करीत आहेत. याच कालावधीत ८ व ९ जानेवारीला पोस्टाच्या कर्मचाºयांनी संप पुकारला आहे. ८ जानेवारी रोजी संपाचा पहिला दिवस असल्यामुळे गडचिरोली येथील पोस्ट कार्यालयातील १२ कर्मचारी पोस्टाच्या परिसरात संप करताना बसले होते. पोस्टाचे कार्यालय अत्यावश्यक कामासाठी सुरू ठेवण्यात आले होते. सकाळी १० वाजतापासून ११ ते ११ वाजेपर्यंत नोकरभरती प्रक्रियेचे अर्ज पोस्ट कार्यालयात स्वीकारण्यात आले. मात्र त्यानंतर पोस्टाच्या चंद्रपूर कार्यालयातील एका अधिकाºयाने कामकाज बंद ठेवण्याबाबत सूचित केले. त्यामुळे बेरोजगार युवकांचे अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले. ही माहिती कळताच राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली. दरम्यान जावेद अली यांनी ही बाब खा. अशोक नेते यांना फोनद्वारे कळविली. लागलीच खा. नेते यांनी चंद्रपूर येथील डाक विभागाचे अधिकारी अनुजकुमार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बेरोजगार उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा १२ वाजतापासून गडचिरोलीच्या पोस्ट कार्यालयात बेरोजगार उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करण्यात आली. पोस्ट कार्यालयाच्या परिसरात जेवढे उमेदवार होते, त्या सर्वांना कार्यालयाच्या आत घेऊन यावेळी दार बंद करण्यात आले. मात्र त्यानंतर आलेल्या उमेदवारांना या पोस्ट कार्यालयामार्फत आपले अर्ज स्पीड पोस्ट करता आले नाही.दरम्यान आपल्या विविध मागण्यांसाठी गडचिरोली येथील पोस्ट कार्यालय परिसरात पोस्ट मास्तर एस. बी. डोर्लीकर, आर. एस. लोंढे, व्ही. जी. नरवडे, एन. बी. येरेवार, डी. के. झा, एस. डब्ल्यू. खोब्रागडे, एस. डब्ल्यू. बोडखे, आर. एम. सहारे, आर. एम. उडाण, एस. एन. गडपायले, एस. के. कोत्तावार, आर. एम. वाघमारे आदी कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. गडचिरोली सारखीच परिस्थिती आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, चामोर्शी व इतर तालुका तसेच ग्रामीण भागातील डाक कार्यालयात होती. एकूणच डाक विभागाच्या कर्मचाºयांच्या संपामुळे बेरोजगार उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला.या आहेत डाक कर्मचाºयांच्या मागण्याकमलेश चंद्र कमिटीच्या सकारात्मक शिफारशी अंमलात आणाव्या, जीडीएस कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, सर्व कॅडरमधील रिक्त पदे भरण्यात यावी, वेतनाच्या कमीत कमी ५० टक्के पेन्शन देण्याची हमी द्यावी, खासगीकरण व कार्पोरटायझेशन बंद करावे, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.