Next

video : कुलदीप यादवची गोलंदाजी का आहे खास, सांगत आहेत भारताचे प्रशिक्षक

कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गुंडाळला.

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा फिरकीपटू  कुलदीप यादवची गोलंदाजी का खास आहे आणि त्याला एवढे यश कसे मिळाले, याबद्दल भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कुलदीपने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, कर्णधार टिम पेन, नॅथन लायन आणि जोश हेझलवूड यांना बाद केले. कुलदीपने 31.5 षटकांमध्ये 99 धावा देत पाच बळी मिळवले. कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात 322 धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन खेळण्यास भाग पाडले.पाहा हा खास व्हिडीओ