Next

IND vs AUS Test : विराट कोहलीला खुणावतोय विक्रम!

India vs Australia Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्याच कसोटीत विराट कोहलीला अनोखा विक्रम करण्याची संधी आहे. अॅडलेड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत 8 धावा करताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत 1000 धावा करण्याचा पराक्रम तो करेल. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल. त्याशिवाय कर्णधार म्हणून 2000 धावा करण्यासाठी त्याला 13 धावा हव्या आहेत.