Next

वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान कोणाला?

वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास ...

वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास घडविण्याची संधी आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही आणि आजचा विजेता हा क्रिकेटला लाभलेला नवा जेता ठरणार आहे. त्यामुळे आज कोण जिंकणार? कोणाचे पारडे जड असणार? हा चर्चा होणे साहजिकच आहे. पण, त्यापलिकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे ते स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरणार, याकडे.. या शर्यतीत भारताकडून रोहित शर्मा आघाडीवर असला, तरी त्याच्यासमोर कडवे आव्हान उभे आहे.