Next

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी भारताचा कसून सराव

साउदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप मोहिमेच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. आफ्रिकेला ...

साउदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप मोहिमेच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. आफ्रिकेला वर्ल्ड कप स्पर्धेत दोन पराभवांचा सामना करावा लागला असला तरी त्यांना हलक्यात लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू कसून सरावाला लागले आहेत. विशेषतः भारतीय गोलंदाज आपला दबदबा सिद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत.