Next

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसाठी सोपा पेपर?

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा ज्वर आता हळुहळू वाढत चालला आहे. आतापर्यंत झालेले दोन्ही ...

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा ज्वर आता हळुहळू वाढत चालला आहे. आतापर्यंत झालेले दोन्ही सामने एकतर्फी झाले आहेत आणि चाहते थरार अनुभवण्यासाठी आतुर आहेत. आजच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका हे भिडतील, तर ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. वर पाहता या दोन्ही लढती एकतर्फी वाटत असल्या तरी श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांकडे बलाढ्य संघांना धक्का देण्याची ताकद आहे.