Next

बीडच्या खासदारांचे बनावट लेटरपॅड वापरून जमीन हडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:27 AM2017-11-24T00:27:34+5:302017-11-24T00:27:54+5:30

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या बनावट लेटरपॅडवर बनावट सहीनिशी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून पंडित दीनदयाळ धर्मार्थ रु ग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्रासाठी तीन एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संस्थेच्या विश्वस्तांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

ठळक मुद्देदीनदयाळ रुग्णालय व मुंडे योग निसर्गोपचार केंद्राच्या विश्वस्तांवर गुन्हा

बीड : खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या बनावट लेटरपॅडवर बनावट सहीनिशी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून पंडित दीनदयाळ धर्मार्थ रु ग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्रासाठी तीन एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संस्थेच्या विश्वस्तांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.पंडित दीनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्र गेवराई तालुक्यातील वाहेगाव आम्ला येथे प्रस्तावित आहे. दोन्ही संस्थांच्या ट्रस्टने रूग्णालय व निसर्गोपचार केंद्रासाठी वाहेगाव आम्ला येथे सर्व्हे क्र . ४७ मध्ये तीन एकर जागेची मागणी मु्ख्यमंत्र्यांकडे केली. यासाठी बीडच्या भाजप खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे लेटरपॅड वापरण्यात आले.मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या बनावट शिफारस पत्राच्या प्रती प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनाही दिल्याचे उघड झाले आहे. त्यांचे स्वीय सहायक नवनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात पंडित दीनदयाळ धर्मार्थ रु ग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्राच्या ट्रस्टींविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक सतीश जाधव करत आहेत.