Next

'सर्वोपचार' रुग्णालयातील वृद्ध रुग्ण वाजवितो नाकाने बासरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 04:15 PM2019-02-02T16:15:10+5:302019-02-02T16:15:33+5:30

अकोला - वेदनांनी त्रस्त रुग्णांच्या गर्दीत ग्रामीण भागातून आलेला एक वयोवृद्ध रुग्ण. जो आपल्या बासरीच्या सुमधूर लयींनी रुग्णांच्या वेदनेवर ...

अकोला - वेदनांनी त्रस्त रुग्णांच्या गर्दीत ग्रामीण भागातून आलेला एक वयोवृद्ध रुग्ण. जो आपल्या बासरीच्या सुमधूर लयींनी रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालत आहे. पातूर तालुक्यातील साहेबराव देशमुख असे त्या रुग्णाचे नाव असून, त्यांच्या बासरीच्या सुरांनी गत आठवड्यापासून रुग्ण व डॉक्टरांच्या मनाला भुरळ घातली आहे.