Next

वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत चार ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 07:11 PM2018-02-05T19:11:49+5:302018-02-05T19:55:29+5:30

वाडेगाव (अकोला): श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक या अपघातात चार भाविक ठार, तर तीन गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

टॅग्स :अपघातAccident