Next

अहमदनगर : अश्व प्रदर्शनात घोड्यांचा लक्षवेधी डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 02:06 PM2018-01-31T14:06:39+5:302018-01-31T17:12:39+5:30

संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील श्री क्षेत्र देवगड यात्रेनिमित्त अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने आयोजीत अश्व व पशु प्रदर्शनात अश्वांच्या ...

संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील श्री क्षेत्र देवगड यात्रेनिमित्त अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने आयोजीत अश्व व पशु प्रदर्शनात अश्वांच्या चित्तथरारक कसरतींनी व त्यांच्या नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.हिवरगाव पावसा येथे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाचे देवस्थान आहे. येथे माघ पौर्णिमेदिवशी भरणा-या यात्रोत्सवानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून संगमनेरअश्वीप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अश्व व पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.