गावे पाणीदार करण्यासाठी युवकाचा सायकल प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:23 PM2019-04-12T16:23:41+5:302019-04-12T16:23:46+5:30

उंबर्डा बाजार :  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गांवे पाणीदार व्हावी या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी  कारंजा तालुक्यातील वाई  येथील विक्की अहीरवार हा युवक गांवोगांवी सायकलवरून प्रवास करून गांव पाणी टंचाई मुक्त होण्यासाठी जनजागृती करीत आहे.

Youth's bicycle travel to awareness about water conservation | गावे पाणीदार करण्यासाठी युवकाचा सायकल प्रवास 

गावे पाणीदार करण्यासाठी युवकाचा सायकल प्रवास 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डा बाजार :  पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गांवे पाणीदार व्हावी या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी  कारंजा तालुक्यातील वाई  येथील विक्की अहीरवार हा युवक गांवोगांवी सायकलवरून प्रवास करून गांव पाणी टंचाई मुक्त होण्यासाठी जनजागृती करीत आहे. तो गांवात शोषखड्डे  तयार करण्यासाठी गांवकºयांना  मार्गदर्शन करीत आहे.
        बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम सराळा येथे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून  प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणास विक्की सुध्दा सहभागी झाला होता. विक्की अहीरवार याने प्रशिक्षण पुर्ण झाल्याबरोबर गांवी परत येताच तालुक्यातील गांवे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणीदार होवून पाणी टंचाईमुक्त व्हावी याकरिता दृढनिश्चय केला.   त्या अनुषंगाने  विक्की याने गावोगावी सायकलवरून प्रवास करून  गावकरी मंडळीना पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती देण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांना गांवात शोषखड्डे तयार करण्यासाठी  प्रबोधन करुन सहकार्य करण्यास हातभार लावला.  विक्की अहीरवार याने उंबर्डाबाजार गावाला भेट दिली असता  येथील पाणी फाऊंडेशनच्या टिमने त्याचे    स्वागत करण्यात आले. यानंतर पुढे निघून गेला. 
यावेळी भारत कानडे मंगेश घोडे उमेश काळबांडे सह अन्य सहकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी विक्की ने गावकºयांना मार्गदर्शन करुन पुढच्या गावास निघून गेले. या युवकाने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत असून ज्याही गावात तो जात आहे तेथे त्यास मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: Youth's bicycle travel to awareness about water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.