बचत गटातील महिलांनी पुकारले उपोषण; मीटर रिडिंगची कामे काढून घेतल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:27 PM2018-01-02T18:27:12+5:302018-01-02T18:28:39+5:30

वाशिम: शहरातील भाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या विद्यूत मीटरचे चुकीचे रिडिंग घेतल्याचा ठपका ठेवून महावितरणने महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुह या बचतगटातील महिलांनी १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून २ जानेवारीलाही ते सुरूच असल्याचे दिसून आले. 

Women self help Group fasting washim | बचत गटातील महिलांनी पुकारले उपोषण; मीटर रिडिंगची कामे काढून घेतल्याचा निषेध

बचत गटातील महिलांनी पुकारले उपोषण; मीटर रिडिंगची कामे काढून घेतल्याचा निषेध

Next
ठळक मुद्देबचतगटातील महिलांनी १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून २ जानेवारीलाही ते सुरूच असल्याचे दिसून आले. बचत गटाच्या एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली.

वाशिम: शहरातील भाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या विद्यूत मीटरचे चुकीचे रिडिंग घेतल्याचा ठपका ठेवून महावितरणने महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुह या बचतगटातील महिलांनी १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून २ जानेवारीलाही ते सुरूच असल्याचे दिसून आले. 

यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केलेल्या निवेदनात बचत गटातील महिलांनी नमूद केले आहे, की आमच्याकडे काम असलेल्या भागात ९५ टक्के ग्राहक महावितरणच्या काऊंटरवर; तर केवळ ५ टक्के ग्राहक मोबाईल अ‍ॅपव्दारे बिलाचा भरणा करतात. त्यामुळे चुकीचे रिडिंग घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याऊलट अचूक रिडिंग घेतल्यामुळे ग्राहकांच्या देयक रकमेत वाढ झाल्याने महावितरणच्या महसूलात वृद्धी झाली; परंतु ग्राहकांचा रोष ओढवला गेला. त्यासाठी एजन्सीला दोषी धरणे चुकीचे आहे. एकूणच या सर्व बाबींचा विचार करून बचत गटाच्या एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली.

Web Title: Women self help Group fasting washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.