विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:15 PM2018-08-13T14:15:45+5:302018-08-13T14:17:38+5:30

राजूरा (वाशिम)- येथून दोन किमी अंतरावरील सुकांडा येथे सविता  प्रल्हाद अंभोरे (२५)े या विवाहितेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान उघडकीस आली.

women drowene in well | विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू 

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू 

Next
ठळक मुद्दे१३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान सुनिता ही गावालगतच्या शेतात निंदनाचे काम करण्यासाठी इतर महिलांसमवेत गेली होती. गावातील तरुणांना बोलावून विहिरीमध्ये शोध घेतला असता, ती विहिरीत आढळून आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूरा (वाशिम)- येथून दोन किमी अंतरावरील सुकांडा येथे सविता  प्रल्हाद अंभोरे (२५)े या विवाहितेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान उघडकीस आली.
सुनिता अंभोरे हिचा विवाह रिसोड तालुक्यातील रिठद येथील प्रल्हाद अंभोेरे यांचेशी झालेला असून तिला एक मुलगी आहे. गत चार सहा दिवसांपूर्वी सुनिता ही सुकांडा येथे माहेरी आई मंदाबाई सदाशिव राउत यांचेकडे आली होती. १३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान सुनिता ही गावालगतच्या शेतात निंदनाचे काम करण्यासाठी इतर महिलांसमवेत गेली होती. ११ वाजतादरम्यान पिण्यासाठी पाणी आणण्याकरिता शेतातील विहिरीवर कळशी घेवून गेली होती. पाण्यासाठी गेलेली सुनिता परत न आल्याने महिलांनी विहिरीकडे धाव घेतली असता, सुनिता आढळून आली नाही. गावातील तरुणांना बोलावून विहिरीमध्ये शोध घेतला असता, ती विहिरीत आढळून आली. पाण्याबाहेर काढले असता बेशुद्धावस्थेत  आढळून आली. घटनेची माहिती मालेगाव पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंगडे व सहकारी करीत आहेत.

Web Title: women drowene in well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.