पाण्याअभावी मानोरा शहरातील जलकुंभ कोरडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 04:36 PM2019-04-19T16:36:43+5:302019-04-19T16:37:14+5:30

पाण्याअभावी ही जलकुंभ अनेक वर्षापासुन कोरडीच आहे.

Water tank dry in Manora City due to water scarcity | पाण्याअभावी मानोरा शहरातील जलकुंभ कोरडी!

पाण्याअभावी मानोरा शहरातील जलकुंभ कोरडी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा :  तालुक्यातुन शासकीय कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी तहसील व पं.स.कार्यालयात तत्कालीन आमदार बि.टी.देशमुख यांनी पाणपोई उभारण्यात आली, परंतु पाण्याअभावी  जलकुंभ अनेक वर्षापासुन कोरडीच आहे.
सुर्य आग ओकु लागल्याने नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे. अशा तप्त उन्हात नागरिक शासकीय कार्यालयात कामासाठी येतात, पंरतु अनेक वर्षापासुन बांधलेली जलकुंभ कोरडीच असल्यामुळे न ागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
 तत्कालीन आमदार बि.टी.देशमुख यांनी त्याच्या निधीतुन तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जलकुंभ  बांधली, परंतु स्थानिक लेवलवर त्यामध्ये  पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे ही जलकुंभे अनेक वर्षापासुन कोरडी आहे, फक्त शासकीय कार्यालयात वैभवात भर पडत आहे. 
नव्याने बांधण्यात आलेल्या पंचायत समिती कार्यालयात आतमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी फ्रिजरची व्यवस्था करण्यात आली, परंतु बाहेर उभे असलेले जलकुंभ कोरडेच आहे. किमान त्यामध्ये पाणी सोडून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.

Web Title: Water tank dry in Manora City due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.