सेवानिवृत्त अभियंत्याची अशीही जलसेवा; ग्रामस्थांसाठी स्वखर्चातून पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 04:56 PM2019-05-16T16:56:39+5:302019-05-16T16:57:13+5:30

पाणीटंचाईच्या काळात गावकºयांना आवश्यक तेवढे पाणी मिळावे या उद्देशातून सेवानिवृत्त अभियंत्यांनी स्वखर्चातून बोअरची व्यवस्था केली.

Water supply through self-service for the villagers | सेवानिवृत्त अभियंत्याची अशीही जलसेवा; ग्रामस्थांसाठी स्वखर्चातून पाणीपुरवठा

सेवानिवृत्त अभियंत्याची अशीही जलसेवा; ग्रामस्थांसाठी स्वखर्चातून पाणीपुरवठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यातील भर जहॉगीर येथील भीषण पाणीटंचाईच्या काळात गावकºयांना आवश्यक तेवढे पाणी मिळावे या उद्देशातून सेवानिवृत्त अभियंत्यांनी स्वखर्चातून बोअरची व्यवस्था केली. परिसरातील ४० ते ५० कुटुंबांना ते गत दहा वर्षांपासून मोफत करीत आहेत. सिताराम सभादिंडे असे या सेवानिवृत्त अभियंत्यांचे नाव आहे.
भर जहॉगीर येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षीदेखील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. ग्रामस्थांना तीन किमी अंतरावरील शेतातील एका खासगी विहिरीमधून पाणी आणण्याची कसरत करावी लागते. गावातील पाणीटंचाई लक्षात घेता १० वर्षांपूर्वी सिताराम सभादिंडे यांनी गावात राहत्या घर परिसरात स्वखर्चातून बोअरची व्यवस्था केली. या बोअरला भरपूर प्रमाणात पाणी असल्याने ते परिसरातील ४० ते ५० कुटुंबाला मोफत पाणी पुरवितात. दहा वर्षात एकदाही बोअर आटली नाही, असे सभादिंडे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ५० ते ६० कुटुंबांची तहान भागविली जात आहे.

Web Title: Water supply through self-service for the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.