ठळक मुद्देजिल्हास्तरावर चांभईला प्रथम, कोठारीला द्वितीय क्रमांकजलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते बुधवारी वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील साखरा या गावाला विभागस्तरीय पुरस्कार घोषित झाला असून जिल्हास्तरावर चांभईला प्रथम; तर कोठारी या गावास व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करून गाव पाणीदार बनविण्यासाठी पुढाकार घेणाºया जिल्ह्यातील चांभईला प्रथम, कोठारीला व्दितीय, एकांबा तृतीय, नागठाणा चतुर्थ आणि आमखेडा या गावास पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक घोषित झाले आहे. तालुकास्तरीय पुरस्कारांमध्ये मानोरा प्रथम आणि मंगरूळपीरला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असून पत्रकारांना देण्यात येणाºया पुरस्कारांमध्ये जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार मोहन राऊत यांना जाहीर झाला. याशिवाय अधिकाºयांमध्ये तत्कालिन वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एस. गजभिये, रिसोड येथील कृषी सहायक गजानन फटांगळे यांना पुरस्कार घोषित झाला असून येत्या बुधवारी जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.