वाशिमच्या क्रीडा विभागाकडून युवा खेळाडूंना योगासनांचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:25 PM2018-05-16T16:25:23+5:302018-05-16T16:25:23+5:30

वाशिम : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लहान व युवा खेळाडूंना दैनंदिन सकाळच्या सुमारास योगासनांचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

Wasim Sports Sports Department Yoga lessons for youngsters! | वाशिमच्या क्रीडा विभागाकडून युवा खेळाडूंना योगासनांचे धडे!

वाशिमच्या क्रीडा विभागाकडून युवा खेळाडूंना योगासनांचे धडे!

googlenewsNext
ठळक मुद्दे विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सद्या सुरू आहे. दैनंदिन योगासनांचा सराव करावा, असे आवाहन क्रीडा विभागाकडून केले जात आहे.


वाशिम : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने लहान व युवा खेळाडूंना दैनंदिन सकाळच्या सुमारास योगासनांचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सद्या सुरू आहे. त्याअंतर्गत रिसोड तालुका संयोजक कुलदिप बदर यांनी दैनंदिन सकाळच्या सुमारास युवा व लहान खेळाडूंना योगासन, प्राणायमाचे प्रशिक्षण देवून यासंबंधीची मार्गदर्शन केले. योगासनांमुळे शारिरीक तंदुरूस्ती अबाधित राहून आरोग्यही सुदृढ राहते. त्यामुळे दैनंदिन योगासनांचा सराव करावा, असे आवाहन क्रीडा विभागाकडून केले जात आहे. या शिबिरासाठी क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, रफीक मामू, प्रल्हाद आळणे, भारत वैद्य, प्रा. बाळासाहेब गोटे, विनोद वानखेडे, अशोक राऊत, विनोद जवळकर पुढाकार घेत आहेत.

Web Title: Wasim Sports Sports Department Yoga lessons for youngsters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.