राष्ट्रीय संपादणूक परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 08:22 PM2018-01-21T20:22:26+5:302018-01-21T20:25:41+5:30

वाशिम : वर्ग ३, ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला असून, राज्यातही पहिल्या दहा जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे, अशी माहिती वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी रविवारी दिली.

Washim topped the Amravati division in national election exams! | राष्ट्रीय संपादणूक परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल!

राष्ट्रीय संपादणूक परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल!

Next
ठळक मुद्देनिकाल जाहीरराज्यातही पहिल्या १० जिल्ह्यात 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वर्ग ३, ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला असून, राज्यातही पहिल्या दहा जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे, अशी माहिती वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी रविवारी दिली.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली.  वाशिम जिल्ह्यातील १८३ शाळेतील विद्यार्थ्यांनी ही चाचणी दिली. इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात आली. शाळेतील शिक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी किती ’लर्निंग आऊट कम’ (अध्ययन निष्पत्ती) प्राप्त केले आहे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यांतील काही निवडक शाळांतील विद्यार्थांची पडताळणी या चाचणीच्या आधारे करण्यात आली. देशभरातील सर्व निवडक शाळांमध्ये १३ नोव्हेंबर २०१७ या दिवशी ही चाचणी घेण्यात आली. हे एकप्रकारे सर्वेक्षण असून, तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बहुपयार्यी प्रश्नपद्धतीने ही चाचणी घेण्यात आली. तिसरी व पाचवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र या घटकावर आधारित ४५ गुणांचे ४५ प्रश्न होते तर आठवीसाठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र, सामाजिक शास्त्र या घटकावर आधारित ६० गुणांसाठी ६० प्रश्न होते.  परीक्षा संपल्यावर वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेऊन त्याच दिवशी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जिल्हा कक्षात जमा करण्यात आल्या. या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका राज्यस्तरावर पाठवून तपासण्यात आल्या. त्याचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये वाशिम जिल्ह्याने अमरावती विभागात प्रथम, तर राज्यात पहिल्या १० मध्ये स्थान पटकावले. जाहीर निकालानुसार तिसºया वर्गाच्या चाचणीत वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयात ७१.८४ टक्क्यांसह राज्यात नववे, भाषा विषयात ७२.४४ टक्क्यांसह १३ वे, तर गणित विषयात ६८.२ टक्क्यांसह तिसरे स्थान पटकावले. वर्ग ५ वीच्या चाचणीत पर्यावरण शास्त्र विषयात ५९.७४ टक्क्यांसह नववे, भाषा विषयात ६२.८६ टक्क्यांसह १४ वे, तर गणित विषयात ५६.६१ टक्क्यांसह आठवे स्थान पटकावले. वर्ग ८ वीच्या चाचणीत विज्ञान विषयात ३८.१ टक्क्यांसह २१ वे, भाषा विषयात ५९.५४ टक्क्यांसह २२ वे, गणित विषयात ४१.५७ टक्क्यांसह १२ वे, तर सामाजिक शास्त्र विषयात ४१.८९ टक्क्यांसह १५ वे स्थान पटकावले. वाशिम जिल्ह्याची एकूण कामगिरी अमरावती विभागात पहिल्या, तर राज्यात नवव्या क्रमांकाची ठरली आहे. 

बुलडाणा विभागात दुसरा
संपादणूक सर्वेक्षणात अमरावती विभागापाठोपाठ बुलडाणा जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात विभागात तिसºया स्थानावर अकोला, चौथ्या स्थानावर अमरावती, तर पाचव्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील आठव्या वर्गाच्या विद्यांर्थ्यांची शैक्षणिक प्रगती अमरावती विभागात सर्वात सरस ठरली आहे. संपादणूक सर्वेक्षण अहवाला नुसार बुलडाण्यातील आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात ४५.३५ टक्क्यांसह ६ वे, भाषा विषयात ६३.७६ टक्क्यांसह १४  वे, गणित विषयात ४४.२ टक्क्यांसह ७ वे, तर सामाजिक शास्त्र विषयात ४६.४४ टक्क्यांसह ६ वे स्थान पटकावले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तसेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षकांच्या सहकायार्ने शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय संपादणूक सवैक्षणात अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला आहे. राज्यातही टॉप टेन मध्ये आहे. सर्वांच्या सहकायार्तून हे शक्य झाले असून, यापुढेही शैक्षणिक उर्जा उंचाविण्यासाठी प्रत्यक्ष कृती व विविध उपक्रमावर भर दिला जाईल.
-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वाशिम

Web Title: Washim topped the Amravati division in national election exams!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.