वाशिम : जुगार, वरली-मटका बंद करण्यासाठी मानोरा येथे रास्तारोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:38 PM2018-01-01T22:38:33+5:302018-01-01T22:40:51+5:30

मानोरा (वाशिम): शहरात बिनबोभाट सुरू असलेल्या बेकायदा वरली-मटका व जुगार बंद करण्यासाठी गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात १ जानेवारी रोजी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मानोरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १३ युवकांना अटक करून त्यांची सुटका केली.

Washim: Stop the gambling, wareli-maqa and stop the road at Manora! | वाशिम : जुगार, वरली-मटका बंद करण्यासाठी मानोरा येथे रास्तारोको!

वाशिम : जुगार, वरली-मटका बंद करण्यासाठी मानोरा येथे रास्तारोको!

googlenewsNext
ठळक मुद्देआक्रमक पवित्रा१३ युवकांना अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): शहरात बिनबोभाट सुरू असलेल्या बेकायदा वरली-मटका व जुगार बंद करण्यासाठी गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात १ जानेवारी रोजी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मानोरा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १३ युवकांना अटक करून त्यांची सुटका केली.
मानोरा शहरात गत अनेक दिवसांपासून वरली-मटका आणि जुगार सुरू आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होवून उघड्यावर आले आहेत. अवैध बंद करण्यासाठी माहुली येथील गजानन चव्हाण यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देवून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर १ जानेवारी रोजी दिग्रस चौकात रास्तारोको करण्यात आला. यावेळी दिग्रस चौकातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना अटक करून त्यांची सुटका केली.

Web Title: Washim: Stop the gambling, wareli-maqa and stop the road at Manora!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.