वाशिम पोलिसांकडून जुगा-यांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 08:20 PM2017-11-07T20:20:08+5:302017-11-07T20:22:21+5:30

वाशिम पोलिसांनी गेल्या दोनच दिवसांत पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर धाडी टाकून अंदाजे ७५ हजार रुपये किमतीच्या ५ जुन्या दुचाकी, २५०० रूपयांचा मोबाईल आणि  रोख  ८ हजार ९०० रुपये जप्त करीत ११ जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.

Washim police action on juga! | वाशिम पोलिसांकडून जुगा-यांवर कारवाई!

वाशिम पोलिसांकडून जुगा-यांवर कारवाई!

Next
ठळक मुद्देविविध ठिकाणी छापेरोख रकमेसह पाच दुचाकी जप्त  

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:  पोलिसांनी जिल्ह्यात जुगारांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पथकांकडून धाडसत्र राबविण्यात येत असून, गेल्या दोनच दिवसांत पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर धाडी टाकून अंदाजे ७५ हजार रुपये किमतीच्या ५ जुन्या दुचाकी, २५०० रूपयांचा मोबाईल आणि  रोख  ८ हजार ९०० रुपये जप्त करीत ११ जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.
कारंजा ग्रामीण पोलिसांनी वाघोळा येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर ६ नोव्हेंबर रोजी धाड टाकत ९०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करीत एकूण सात जणांवर मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. बाबुलाल नरसिंग आडे , बबन रामचंद्र गव्हाणे, नरेश चरण पवार, गणेश  वाघमारे, अनिल  गजभार, पुरुषोत्तम अघमे, रामप्रसाद आडे, अशी आरोपींची नावे आहेत. त्याशिवाय मंगरुळपीर पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजीच टाकलेल्या छाप्यात अजहर अजिज शेख, तौफीक अजीज शेख, गणेश विष्णु मानवतकर, इरशान शेख बुरान शेख हे चार जण जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ दुचाकी, १ मोबाईल आणि ८ हजार रुपयांची रोख जप्त केली. जुगारांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे बिनधास्तपणे कोठेही डाव मांडून जुगार खेळत बसणाºयांचे धाबे दणाणल्याचे दिसत आहे. 

Web Title: Washim police action on juga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.