वाशिम नगर परिषद : रासेयो पथकाचे  स्वच्छतादूत देताहेत स्वच्छतेचा संदेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 02:02 PM2017-12-12T14:02:49+5:302017-12-12T14:05:34+5:30

वाशिम - स्थानिक  मातोश्री शांताबाई  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा पथकातील स्वच्छतादूत ११ डीसेंबरपासून वाशीम शहरामध्ये स्वच्छतेचा संदेश देत आहेत. 

Washim Nagar Parishad: NSS students give clinlyness massage | वाशिम नगर परिषद : रासेयो पथकाचे  स्वच्छतादूत देताहेत स्वच्छतेचा संदेश !

वाशिम नगर परिषद : रासेयो पथकाचे  स्वच्छतादूत देताहेत स्वच्छतेचा संदेश !

googlenewsNext
ठळक मुद्देमातोश्री शांताबाई  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा पथकातील स्वच्छतादूत.स्वच्छता अॅपचा जास्तीत जातीस वापर करून शहराला स्वच्छ व सुंदर बनवूयात. प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर करू नका हे नागरिकांना पटवून दिले जात आहे.


वाशिम - स्थानिक  मातोश्री शांताबाई  कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा पथकातील स्वच्छतादूत ११ डीसेंबरपासून वाशीम शहरामध्ये स्वच्छतेचा संदेश देत आहेत. 
नगर परिषद वाशिमचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी सूचित केल्यानुसार शहरातील हिंगोली नाका  व पुसद नाका व्यापारी संकुल परिसरात फळ विक्रते, भाजीपाला विक्रते, तसेच किराणादुकान, जनरल स्टोअर्स मध्ये जाऊन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या मानवी आरोग्य तथा पर्यावरणास कशा प्रकारे घातक आहेत, हे पटवून सांगितले जात आहे. प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर करू नका हे नागरिकांना पटवून दिले जात आहे. शासनाने सुरु केलेल्या स्वच्छता अॅपची माहिती याप्रसंगी व्यापारी तथा  ग्राहकांना स्वच्छतादूतांतर्फ दिली जात आहे.  स्वच्छता अॅपचा जास्तीत जातीस वापर करून शहराला स्वच्छ व सुंदर बनवूयात, हा स्वच्छता संदेश रासेयोचेे स्वच्छतादूत देत  सर्वत्र  आहे.  या कार्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.नारायणराव गोटे तथा कार्यकारी प्राचार्य डॉ.जी.एस.कुबडे यांनी कौतुक केले आहे.
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक दामोदर यांच्या मार्गदर्शनात रासेयो गटप्रमुख अजय राजे, शिवानी गोदारा, सुनील साबळे, अंकुश जटाळे, आकाश कुबडे, अनुराधा  कान्हेड, अतुल बोरचाटे, गणेश खुळे, धनराज राठोड व अनिकेत वाघ या स्वच्छतादूतांनी पुढाकार घेतला.

Web Title: Washim Nagar Parishad: NSS students give clinlyness massage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम