वाशिम : भावाचा जीव वाचविण्यासाठी बाहिणीने केले ‘किडनीदान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:36 AM2017-12-15T00:36:45+5:302017-12-15T00:38:51+5:30

प्राचीन काळापासून बहिण-भावाच्या नात्याची महती वर्णीली जाते. वाशिम तालुक्यातील भट उमरा या गावातील एका बहिणीने भावासाठी किडनी देऊन बहिण-भावाचं नातं किती सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली. देवकाबाई श्रीराम वानखेडे असे बहिणीचे नाव असून, डॉ. दामोदर रामजी काळे असे भावाचे नाव आहे. 

Washim: 'Kidnidan' done by sister to save brother's life! | वाशिम : भावाचा जीव वाचविण्यासाठी बाहिणीने केले ‘किडनीदान’!

वाशिम : भावाचा जीव वाचविण्यासाठी बाहिणीने केले ‘किडनीदान’!

googlenewsNext
ठळक मुद्देवाशिम तालुक्यातील भट उमरा येथील काळे परिवाराचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्राचीन काळापासून बहिण-भावाच्या नात्याची महती वर्णीली जाते. वाशिम तालुक्यातील भट उमरा या गावातील एका बहिणीने भावासाठी किडनी देऊन बहिण-भावाचं नातं किती सर्वश्रेष्ठ आहे, याची प्रचिती दिली. देवकाबाई श्रीराम वानखेडे असे बहिणीचे नाव असून, डॉ. दामोदर रामजी काळे असे भावाचे नाव आहे. 
वाशिम तालुक्यातील भट उमरा येथील रहिवाशी व वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, शेतकरी नेते डॉ. दामोदर रामजी काळे यांना जून २0१७ पासून किडनीच्या दूर्धर आजाराने ग्रासले होते. अकोला व औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमधील उपचाराअंती किडनी प्रत्यारोपन हाच एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा काळे कुटुंबीयांनी किडनी उपचार व प्रत्यारोपनासाठी गुजरात राज्यातील एका युरॉलॉजीकल हॉस्पीटल येथे डॉ. काळे यांना दाखल केले. यावेळी डॉ. काळे यांची कनिष्ठ बहिणी पार्डी आसरा येथील निवासी देवकाबाई वानखेडे यांनी स्वत:ची किडनी भावाला देण्यासाठी पुढाकार घेतला. गुजरातमधील नडियाद येथील हॉस्पीटलमध्ये डॉ. उमापती हेगडे व डॉ. राजापूरकर या डॉक्टरांनी दोन्ही भावा-बहिणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करीत किडनी प्रत्यारोपन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. सुरुवातीला काही दिवस डॉ. दामोदर काळे यांना सातत्याने व्हेंटीलेंटरवर रहावे लागले. सध्या दोन्ही बहिण-भावाची प्रकृती उत्तम असून माझी बहीणच माझ्यासाठी ईश्‍वर असून आपल्याला तिचा सार्थ अभिमान असल्याचे डॉ. दामोदर काळे यांनी सांगीतले. देवकाबाई यांनी घेतलेल्या निर्णयाचे जिल्ह्याभरात सर्व समाजस्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. देवकाबाई वानखेडे यांची प्रेरणा घेऊन मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प काळे कुटुंबीयांनी केला असल्याचे डॉ. दामोदर काळे यांचे चिरंजीव डॉ. विजय काळे यांनी सांगीतले.

Web Title: Washim: 'Kidnidan' done by sister to save brother's life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.