Washim: Kabaddi thriller to play Sunday at Mirzapur! | वाशिम : मिर्झापूर येथे रविवारी रंगणार कबड्डीचा थरार!

ठळक मुद्देरविवार, २४ डिसेंबर रोजी कबड्डीचे ५२ किलो आतील वजनी एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त एकूण २७ हजार रुपयाची बक्षीसे विजेत्या संघासाठी ठेवण्यात आली आहेत. जय रेणूका क्रीडा संघ, जाणता राजा मित्रमंडळ व शुभम सोमटकर मित्रमंडळाच्या संयुक्त आयोजनातून होणार सामने.

वाशिम - श्री रेणूकामाता यात्रेनिमित्त मालेगाव तालुक्यातील ग्राम मिर्झापूर येथे जय रेणूका क्रीडा संघ, जाणता राजा मित्रमंडळ व शुभम सोमटकर मित्रमंडळाच्या संयुक्त आयोजनातून रविवार, २४ डिसेंबर रोजी कबड्डीचे ५२ किलो आतील वजनी एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  यानिमित्त एकूण २७ हजार रुपयाची बक्षीसे विजेत्या संघासाठी ठेवण्यात आली आहेत. कबड्डीचे सामन्याला सायंकाळी ४ वाजता सुरुवात होईल. सामन्याचे उद्घाटन शिरपूरचे ठाणेदार हरिष गवळी, शिवाजी बकाल, सरपंच गंगाधर सोमटकर, गणेश घोडमोडे, सदाशिव सोमटकर यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. कृषी सभापती विश्वनाथ सानप, मनसे जिल्हाध्यक्ष अशोक अंभोरे, पं.स. सभापती ज्ञानबा सावले यांची प्रमुख उपस्थिती राहील. ग्रा.पं. किन्ही घोडमोडचे सरपंच गणेश घोडमोडे यांच्या वतीने प्रथम बक्षीस ११ हजार रुपये, शिक्षक गणेश नानोटे, डॉ. रमेश सोमटकर यांच्या वतीने व्दितीय बक्षीस ७ हजार रुपये, गजानन सोळंके, सेवा सोसायटी अध्यक्ष नंदु वाघ यांच्या वतीने तृतीय बक्षीस ५ हजार रुपये, पं.स. सदस्य शिवाजी बकाल, गजानन सोमटकर यांच्या वतीने चतुर्थ बक्षीस ३ हजार रुपये तर राष्ट्रवादी  विद्यार्थी काँग्रेसचे मालेगाव तालुकाध्यक्ष शुभम सोमटकर यांच्या वतीने पाचवे बक्षीस एक हजार एक रुपये विजेत्या संघाला दिल्या जाईल. जिल्हयातील सर्व कबड्डी संघांनी या सामन्यात भाग घ्यावा असे आवाहन युवा प्रतिष्ठान मिर्झापुर, जय रेणूका क्रीडा संघ, जाणता राजा मित्रमंडळ व शुभम सोमटकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Web Title: Washim: Kabaddi thriller to play Sunday at Mirzapur!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.