वाशिम : शिरपूरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; तिघांना घेतला चावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 07:22 PM2018-01-24T19:22:15+5:302018-01-24T19:25:11+5:30

शिरपूर जैन (वाशिम) : येथे मागील आठवडाभरापासुन एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही माकड जेरबंद करण्यात यश मिळाले नाही.

Washim: Haidos, a serpent blamed on the head; Three bites! | वाशिम : शिरपूरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; तिघांना घेतला चावा!

वाशिम : शिरपूरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; तिघांना घेतला चावा!

googlenewsNext
ठळक मुद्देमाकड पकडण्यात वनविभागाला अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : येथे मागील आठवडाभरापासुन एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही माकड जेरबंद करण्यात यश मिळाले नाही.
गत आठवड्यापासुन शिरपूर येथे एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाने १७ जानेवारी रोजी संतोष भालेराव, २२ जानेवारी रोजी शेख अंसार यास चावा घेतला तर २४ जानेवारी रोजी हसीन खॉ पठाण या युवकाच्या घरात घुसुन त्यास जबर चावा घेतला. या सर्व जखमीवर अकोला येथे उपचार करण्यात येत आहेत. या माकडाला पकडण्यासाठी १९ जानेवारी रोजी वनविभागाने कर्मचारी आले असता,  माकडाने या पथकाला गुंगारा देवुन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यावेळी माकडाने अंगावर उडी घेतल्याने साठे नामक वन कर्मचारी खाली पडून जखमी झाला. त्यानंतर २२ जानेवारी रोजी रोजी १५ ते २० वनकर्मचाºयांचा ताफा गावात दाखल झाला होता. शर्थीचे प्रयत्न करुनही माकड जाळयात अडकले नाही. यावेळी गावकºयांच्या गोंधळामुळे माकड हाती लागत नसल्याचा दावा वनविभागाच्या पथकाने केला. २४ जानेवारी रोजी पुन्हा वनविभागाच्या पथकाने माकड पकडण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर माकडाला जेरबंद करण्यात आले नव्हते. दरम्यान, या माकडामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 

Web Title: Washim: Haidos, a serpent blamed on the head; Three bites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.